अहिल्यानगर (दि.१६ प्रतिनिधी):-नांदगाव येथील एम.बी.पान स्टॉल या टपरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत गुटखा व पान मसाला १,५१,९६० (एक लाख ५१ हजार ९६०) रुपयांच्या मुद्देमालासह ३ आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून तात्काळ कारवाई करा असे आदेश दिले होते. गुप्त खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना बातमी मिळाली की नांदगाव येथील होटेल खालसा पंजाब होटेल जवळ असलेल्या एम.बी.पान स्टॉल या टपरीमध्ये बसलेल्या इसमास दोन इसम निळे रंगाचे एक्सेस मोटारसायकलवरुन महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधोत असलेला गुटखा पानमसाला विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर माहिती पोनि. श्री.आहेर यांनी माहिती तात्काळ पथकातील कर्मचारी पोकॉ/६३० विशाल अण्णासाहेब तनपुरे,पोहेकॉ /१३७२ संतोष शंकर लोढे,पोहेकॉ/गणेश पोपट लोढे,पोना/ सोमनाथ आस्मानराव झांबरे,पोकॉ/शिवाजी अशोक ढाकणे,पोकॉ/रणजित पोपट जाधव,चालक.पोहोकॉ/ उमाकांत गावडे असे पथकातील कर्मचारी यांना खात्री करुन कारवाई करणेबाबत सूचना दिल्याने शासकिय वाहन क्रमांक MH20EE9161 तात्काळ हॉटेल परिसरामध्ये सापळा रचून थांबलले असता ९.२५ वा.चे सुमारास एक निळे रंगाचे विनानंबरचे मोटारसायकलवर दोन इसम एम.बी पान स्टॉल या टपरीजवळ बातमीतील हकीगतीप्रमाणे थांबलेले असताना पोलिसांची खात्री झाल्याने त्या ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले असता त्यांनी त्यांचे नाव मुजाहिद जावेद सय्यद वय २४ वर्षे,रा.कोठला,मोईन जावेद सय्यद यय २१ वर्षे, रा.सदर असे असल्याचे सांगितले.पानटपरीत व मोटारसायकल मध्ये आरएमडी पान मसाला विमल आणि मसाला व इतर गुटखा प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली.