अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यां विरूध्द गुन्हे शाखेने कारवाई करत 2 आरोपीकडून 25, 01,500/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या आदेशानुसार अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार हे अवैध वाळु उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेकामी पाथर्डी येथे रवाना झाले असता दि.17 जानेवारी रोजी पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संतोष जाधव व बाळु जाधव असे हनुमान टाकळी,ता.पाथर्डी येथील वृध्दा नदी पात्रातील वाळु जेबीसीने उपसा करून,वाहतुक करीत आहेत.
पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता संशयीत दोन इसम वृध्दा नदीपात्रातुन वाळु जेसीबीच्या सहाय्याने उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी बाळु भानुदास जाधव, वय 42,रा.शंकरनगर, पाथर्डी,ता.पाथर्डी, संतोष भानुदास जाधव, वय 36,रा.शंकरनगर, पाथर्डी,ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.तपास पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे वाळु वाहतुकीचा शासकीय परवाना नसल्याने त्यांचे कडून 25,01,500/- रू.किंमतीचा मुद्देमाल त्यात एक विना नंबरचा जेसीबी,एक विना नंबरचा पॉवर फार्मा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह व ट्रॉलीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने भरलेली वाळु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील 02 आरोपी विरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 61/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) सह पर्यावरण कायदा कलम 9/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग,श्री. दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे,सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने व रमीझराजा आत्तार यांनी केलेली आहे.