अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी): तारकपूर बस स्थानकावर अनेक वर्षापासून काही खाद्य विक्रेते हातावर व्यवसाय करत होते. मात्र तारकपूर बस स्थानक प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर अचानकपणे बंदी घातल्यामुळे ४० कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तारकपूर बस स्थानक येथे भेट देत खाद्य विक्रेते व प्रशासन यांची बैठक घेत चर्चा घडून आणली, सकारात्मक चर्चेनंतर प्रत्येक खाद्यविक्रेत्याला लायसन देण्याच्या सूचना केल्या त्यानुसार आता खाद्य विक्रेत्यांना लायसन मिळणार असून आता खाद्य विक्रेते बस स्थानकावर हातावर फिरवून पुन्हा व्यवसाय करतील.
खाद्यविक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तोडगा काढल्यामुळे खाद्य विक्रेते यांनी खासदार निलेश लंके यांचे आभार मानले यावेळी आगार प्रमुख अभिजित चौधरी, तारकपूर बस स्थानक प्रमुख अविनाश कलापुरे,माजी नगरसेवक भैय्या परदेशी,गणेश साठे, संदीप शिंदे यांच्यासह खाद्यविक्रेते आदी उपस्थित होते.
नाटक
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक निर्मित आणि इप्टा नाशिक प्रस्तूत,
महाराष्ट्र शासन अनुदान प्राप्त नाटक
*प्रथम पुरूष…लेखक,दिग्दर्शक-संकेत सीमा विश्वास;शनिवार,दि.२५ जानेवारी २०२५, संध्या ५ वा.स्थळ-ऊर्जा रंगभवन, एकता कॉलनी अहमदनगर;तिकिटांसाठी संपर्क- ८०८७४८६७८१