वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-वणी ते नागपूर अशी पदयात्रा २६ डिसेंबर २०२२ ला महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वात नागपूर विधानसभेवर राज्यव्यापी मोर्चा काढला होता.त्यावेळी मा.कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला भेट देऊन २० जानेवारी २३ च्या आत म॑त्रालयात बैठक घेऊन शेतकर-या॑च्या मागण्या पूर्ण करू.असे वचन दिले होते मात्र ते आपण पाळले नाही त्याची आठवण करुन देण्यासाठी व मागण्या त्वरित मान्य कराव्या यासाठी मा.जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्फत मा.कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज निवेदन देण्यात आले.भांडवलदारांच्या हिताकरीता राज्यकारभार चालविणारे शिंदे-फडणवीस सरकार शेतक-यांना दिलेला शब्द विसरले.हा शेतक-यासोबत विश्वासघात आहे.निवेदनात नागपुर अधिवेशना दरम्यान ज्या मागण्या केल्या होत्या त्या पुन्हा निवेदनात देण्यात आल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकर-या॑ना ४० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी,पीक विमा क॑पन्याना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याचे शासनाने आदेश द्यावे,अतिवृष्टी फक्त नैसर्गिकच नाही तर कोळसा क॑पन्या,थर्मल पावर स्टेशन प्रशासन, धरणे ,व्यवस्था प्रशासन यांच्या बेजबाबदार धोरणा मुळे पुराची तीव्रता वाढली.त्याकरिता चौकशीसाठी न्यायिक आयोगाचे गठन करावे,कापसाला १२०००/- रू. प्रती क्विंटल भाव देण्याची खात्री द्यावी,वनाधिकार कायदा- २००६-८-स॑शोधन २०१२ च्या नुसार करा,प्रलंबित वनहक्क दावे निकालात काढावे,वनहक्क दावे धारका॑च्या पुर्णविचार याचिकेवर विचार करावा,२० वर्षापासून महसुलाच्या जागेवर अतिक्रमित शेतकर-या॑ना जमिनीचा मालकी हक्क द्यावा,वनहक्क दावे मिळालेल्या शेतकर-या॑ना फेरफार, वारसान नोंद , बॅ॑कैद्वारे पीककर्ज, शेती समतल करून देणे, शेतावर विहीर,विद्युत पुरवठा आदीची पुर्तता करा.या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी वर्धा जिल्हा किसान सभेचे उपाध्यक्ष गजेंद्र सुरकार, जिल्हा सचिव व्दारकाताई ईमडवार,आयटकचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोसावी, कार्यकर्ते रामकृष्ण महल्ले,विनायक नन्नोरे मारोतराव ईमडवार अंगणवाडी सेविका संघटनेच्या विजयाताई पावडे आदींचा निवेदन देतांना प्रामुख्याने समावेश होता.
