अहिल्यानगर (दि.३ प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डी देवस्थानच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे.या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
तर एकजण गंभीर जखमी झाला.त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतःपुन्हा फकदा बोजवारा उडाला आहे.त्यातील आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला.तसेच दुसरी घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील सेवेकरी हे काही दिवसांपासून बेपत्ता झाले होते.मात्र दोन दिवसांपूर्वी त्याचे मुंडके एका विहिरीत तर धड दुसऱ्या विहिरीत आढळून होते.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच आज (दि.3) फेब्रुवारी रोजी सकाळी शिर्डी देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला आहे.त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून,संबंधित पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांचा जिल्ह्यातून वचक संपला की काय असं वाटायला लागले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. यामुळे अशा दुर्घटना टळतील.