नगर प्रतिनिधी (दि.२६ जानेवारी):- नगर तालुक्यातील निमगाव वाघा परीसरात 03 गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई करून 02 लाख 79 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तसेच तयार दारू नष्ट करून 03 गुन्हे दाखल केले आहे.विविध ठिकाणी गावठी हातभट्टी अड्ड्यांवर छापा टाकून खालील प्रमाणे आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.
1)सचिन नाथा पवार ,रा.निमगाव वाघा,88000 हजार किमतीचे 1100 लिटर हातभट्टी रसायन,12500 रू किमतीची 125 लिटर तयार दारू,एकूण -1 लाख 500 रू, 2)सागर अनिल पवार
2 )महेश अनिल पवार रा.निमगाव वाघा,1,44,000 किमतीचे 1800 लिटर तयार हातभट्टी रसायन,15000/- किमतीची 150 लिटर तयार दारू,एकूण -159000/-
3)भीमा बटाव पवार रा.निमगाव वाघा,20000 किमतीचे 250 लिटर तयार रसायन
एकूण -20000/ सदरची कारवाई कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक/राजेंद्र सानप,पोसई/दिनकर घोरपडे,महेकॉ/प्रमिला गायकवाड,हेकॉ/जगदीश जंबे,पोना/योगेश ठाणगे यांनी केली आहे.

