संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे घडली आहे.
घरासमोर तात्पुरता आडोसा करून उभारण्यात आलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संगमनेर तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.अकबर युनूस सय्यद (रा. चिंचोली गुरव,संगमनेर) या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यातआला आहे.