अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार येथील दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली सुनील नागपूरे ययांची बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या बाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भिंगार शहरात वसंत पंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शोभायात्रा काढण्यावरून समाजातील दोन गटात मतभेद निर्माण झाला होता.तसेच वसंत पंचमीच्या निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी निमित्ताने समाजातील महिलांच्या सामूहिक फोटोंचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते.या फलकावरील मयत महिलेच्या फोटोला अज्ञात इसमाने काळे फासले होते.त्यामुळे मयत महिला या अपमानित झाल्याने आरोपी याने मयत महिलेची बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्याने महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली.
मयत महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,भिंगार येथे वसंत पंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यामध्ये दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली नागपुरे यांनी समाजाची मिरवणुकी सायंकाळी आयोजित केले होते मिरवणुकीत समाजाचे काही नागरिकांनी विरोध केला मिरवणुकी दुपारी काढण्यात यावी यामधून समाजाच्या दोन्ही गटांमध्ये मतभेद होऊ लागले.परंतु त्यानंतर वैशाली नागपुरे व समाजातील स्त्रीयांचे दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी निमित्त् काढण्यात येणा-या मिरवणुकीत भिंगार गावात पेास्टर लावलेले होते. त्यावेळी तीचे बॅनरवरील पोस्टरला कोणीतरी काळे फासले होते.त्यामुळे वैशाली नागपुरे यां अपमानित झालेल्या होत्या.
तसेच यातील आरोपी भूषण याने मयत महिलेचा मुलगा आकाश याच्या मोबाईल वर तुझी आई दिवस रात्र माझ्याशी फोनवर बोलती व माझे सोबत आहे असा मेसेज केला होता.हे सहन न झाल्याने मयत महिलेने गळफास घेतला आहे.व तिच्या आत्महत्याला जबाबदार असणाऱ्या आरोपींच्या नावाने चिट्ठी लिहून ठेवली.कॅम्प पोलिसांनी 9 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार १०८,४९,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.