अहिल्यानगर (दि.19 प्रतिनिधी):- जिल्हापरिषदेतील सहाय्यक लेखाअधिकारी यांनी शिक्षकास मागितली लाच
यशस्वी सापळा कारवाई
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-60 वर्षे
▶️ *आरोपी* अशोक मनोहर शिंदे, वय – 49 ,सहाय्यक लेखाधिकारी, (वर्ग-२) वेतन व भविष्य निर्वाह विभाग , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,अहिल्यानगर, राहणार तुळसाई पार्कच्या पाठीमागे ,गावडे मळा ,पाईपलाईन रोड ,सावेडी ,अहिल्यानगर.
▶️ *लाचेची मागणी-*
20,000/- रुपये.
▶️ **लाच स्विकारली*
8,000/- रुपये.( पहिला हप्ता)
▶️ *हस्तगत रक्कम-*
8,000/- रुपये.
▶️ **लाचेची मागणी** दि.18/02/2025
▶️ *लाच स्वीकारली*
दि.18/02/2025
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार हे शिक्षक असून ते दिनांक 03/06/2022 रोजी शिक्षकी पैशातून सेवा निवृत्त झाले आहेत.परंतु तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्या पासून त्यांना प्रोव्हिडंड फंड आज अखेर मिळालेला नाही. त्याकरीता तक्रारदार हे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयात काम करणारे आलोसे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन पाच सहा वेळेस समक्ष भेट घेतली असता त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार यास म्हणाले की,तुमचे काम खुप जुने असून ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून 20,000 रुपये द्यावे लागतील या बाबतची तक्रार दि.18/02/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि.18/02/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांची प्रोव्हिडंड फंडची फाईल पास करण्यासाठी लाचेचा पहिला हप्ता पंचा समक्ष मागणी केली. दि.18/02/2025 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग अहिल्यानगर येथे सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून आलोसे यांनी पंचा समक्ष 8,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन, जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ * आरोपीच्या अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू-
1) रोख रक्कम रुपये 510
2) वन प्लस कंपनीचा मोबाईल
▶️ * आरोपीच्या घरधढतीची प्रक्रिया चालू आहे
* आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
* आलो से यांचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे
▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे* .
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्रीम. छाया देवरे,
पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8788215086
▶️ *सापळा पथक* पोकॉ-सचिन सुद्रुक, पोकॉ-गजानन गायकवाड
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी-
अजित त्रिपुटे, पोलिस उपअधीक्षक, लाप्रवी, अहिल्यानगर
▶️ **मार्गदर्शक* –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ *आरोपी नं.1 यांचे सक्षम अधिकारी* ** * माननीय संचालक, लेखा व कोषागारे मुंबई**
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*