अहिल्यानगर (दि.20 प्रतिनिधी):- शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.शिवजयंती शांततेत पार पाडण्यासाठी तसेच तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुवस्था अबाधित राखण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या व ज्यांच्याकडून मिरवणुक काळात कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा 95 गुन्हेगाराविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्यावर उपविभागीय दंडाधिकारी यांनी निर्णय देत तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 95 गुन्हेगारांना अहिल्यानगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.सदरचे इसम कुठल्याही परिस्थितीमध्ये अहिल्यानगर शहरातील मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते.तसेच पोलीस ठाण्याच्या स्तरावर देखील पथक नेमण्यात आले होते. शिवजयंतीच्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मोहिम राबविण्यात आली.त्यामध्ये अवैधरित्या कल्याण मटका,देशी-विदेशी दारु तसेच गावठी हात तभट्टीची तयार दारु असा एकुण 7540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपीं विरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले
तोफखाना पोलिसांच्या कारवाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वा जयंती उत्सव मिरवणुक शांततेत पार पडली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग अमोल भारती,पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.