संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव ):- फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठनेते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी माजी मंत्री कलकथित दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त २८ फेब्रुवारी रोजी भंडारदरा येथे धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.मुलगंध कुटी,जेतवन,भंडारदरा,तालुका,अकोले,जिल्हा अहिल्यानगर येथे माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त धम्म यात्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धम्मयात्रे निमित्त धम्म सभेचे आयोजन ॲड.संघराज रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.सदर धम्म सभेला सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव भैय्यासाहेब आंबेडकर,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राहणार आहेत.तर डॉ.रावसाहेब कसबे,माजी आ.शिरीष चौधरी,आ.डॉ.किरण लहामटे,माजी आ.वैभव पिचड,अमित भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म सभा संपन्न होणार आहे.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मिलिंद सोनवणे यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण संपन्न होईल.सकाळी ११ वाजता भदंत नाग घोष पुणे यांची धम्मदेसना संपन्न होईल,दुपारी १२:३० वाजता स्नेह भोजन होईल.दुपारी एक वाजता मिरवणूक संपन्न होईल.त्यानंतर दुपारी २:३० वाजता ॲड.संघराज रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली धम्म सभा संपन्न होईल.
धम्म यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते,धम्म यात्रा कमिटी ग्रामीण विभागाचे अध्यक्ष तथा निमंत्रक मिलिंद सोनवणे,कार्याध्यक्ष पोपटराव सोनवणे,सरचिटणीस विनोद गायकवाड,खजिनदार गोरक्ष राऊत तर धम्म यात्रा कमिटी मुंबई विभागाचे अध्यक्ष तथा निमंत्रक प्रकाशराव लहितकर,कार्याध्यक्ष सुरेश रुपवते,सरचिटणीस सुरेश रोकडे, खजिनदार विजय देठे यांच्यासह बहुजन शिक्षण संघ,दादासाहेब रूपवते फाउंडेशन ,बहुजन सांस्कृतिक केंद्र,जीवक मेडिकल सेंटर,बहुजन हितवर्धक संघ यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी व धम्म यात्रा कमिटी यांनी केले आहे.