छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच अशिक्षित, बेरोजगार,विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्टीने सक्षम बनविणाऱ्या सौ.अनिता लेंडे यांना बुलढाणा येथील माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित ‘तेजस्विनी महाराष्ट्राची’ पुरस्कार 2025 ने पुरस्कारर्थी म्हणून 2 मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.
यावेळी अनिता लेंडे म्हणाल्या की,भारतात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून अशावेळी शारीरिक आणि आर्थिक संपन्नता मिळवून देणारा व्यवसाय किंवा उद्योग महिलांना मिळाला तर ही सर्वांसाठी सर्वोत्तम संधी ठरेल, एमआय लाइफस्टाइल मार्केटिंग ही भारतातील सर्वोत्कृष्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी चे काम सुरू केले.प्रथमता या व्यवसायाची सुरुवात स्वतःपासून केली व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र भर अशिक्षित बेरोजगार विधवा महिलांचे संघटन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.
आणि त्याचेच फळ म्हणून सामाजिक कार्यात कायम सहभाग म्हणून बुलढाणा येथे ‘तेजस्विनी महाराष्ट्राची’ पुरस्कारा ने मला सन्मानित करण्यात आले याचा मला आनंद होत आहे.तसेच येथून पुढे महिलांसाठी वेगवेगळे समाज उपयोगी कामे व आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे होतील याच्यावर अधिक भर देण्याचे काम करणार असल्याचे सौ. लेंडे म्हणाल्या.