संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भजन व भारुडाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एस एम फाउंडेशन हिवरगाव पावसा मच्छिंद्र गडाख व समाधान भालेराव यांच्या संकल्पनेतून तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे यांच्या विशेष सहकार्यातून शिवजयंती निमित्त रात्री नऊ वाजता भजन व भारुडाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या आरतीने झाली. मान्यवर पाहुणे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामूहिक आरती संपन्न झाली.त्यानंतर भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच लोक कलावंत दत्तू पावसे,सर्जेराव पावसे, शाहीर मधुकर भालेराव,अशोक भालेराव,तानाजी मदने यांच्यासह कलाकारांनी उत्कृष्टरित्या भारुड सादर केले.भारुडा मधून अफजलखानाचा वधाचा प्रसंग सादर करण्यात आला. लोककलावंतांनी भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.सदर कार्यक्रमास ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमास सरपंच सुभाष गडाख,देवगड देवस्थानचे विश्वस्त यादवराव पावसे,भाजपा माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष तथा वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे,देवगड खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त उत्तम जाधव,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,डॉ.संदीप पावसे,ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे,भास्करराव पावसे,नामदेव पावसे,सोमनाथ दवंगे,केदारनाथ पावसे,कैलास दिवटे,भाऊसाहेब पावसे,विनोद पावसे,प्रवीण गडाख,रावसाहेब पावसे,गणेश गडाख यांच्या सह महिला तसेच हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.