अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर मनमाड हायवे वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून 3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नऊ ते दहा इसम हे नगर मनमाड रोडवरील विळद घाट येथील चौधरी हॉटेल समोर तळ्याकडे जाणाऱ्या रोड जवळ विळद शिवारात कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत हत्यारे घेऊन दबा धरून बसलेले आहेत.आता गेल्यास लागलीच मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने श्री.चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक घेऊन मिळालेल्या माहितीनुसार विळद घाट येथे येऊन थांबले असताना काही इसम तलावाकडे जाणाऱ्या रोड जवळ मोटरसायकल उभ्या करून पत्र्याच्या दुकानामागे दबा धरून बसल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्यातील दोन इसम हे पळून जाऊ लागले असता पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले एकूण दहा इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले.१) मयुर पोपट बोरुडे वय २४ वर्षे रा. आठरे पाटील स्कुल जवळ शेवाळे मळा अ.नगर २) संकेत विजय वारस्कर वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ३) ऋतिक रमेश शिंदे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ४) संतोष राम घोडके वय २४ वर्ष रा. सिद्धार्थनगर अ.नगर ५) अनिल वसंत घोरपडे वय २६ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर ६) अनिकेत अनिल गायकवाड रा. सिद्धार्थनगर अ.नगर ७) ऋषिकेश राजु पाटोळे वय २५ वर्षे रा. सिध्दार्थनगर अ.नगर ८) शिवम अनिल झेंडे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर ९) अजय राजेश गायकवाड वय २२ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर १०) रोहित वाळु अटक वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
पकडलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता लोखंडी पाईप लोखंडी कुऱ्हाड दोरी मिरचीची पूड लाकडी दांडके चार मोटारसायकली नऊ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अंमलदार किशोर सुभाष जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 229/225 भारतीय न्याय संहिता कलम 310(4),310(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले,यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक देविदास भालेराव,पोहेकॉ/राजू सुद्रिक, मिसाळ,सचिन आडबल,किशोर जाधव,नवनाथ दहिफळे,प्रशांत धुमाळ,चापोहेकॉ/ गिरवले यांनी केली आहे.