अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सुपा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपीस पकडण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.सुपा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 114/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैगिक संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम १२ प्रमाणे दि. 18/03/2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. नमुद गुन्ह्याचा तपास सुपा पोलीस स्टेशन मार्फत चालु होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्याबाबत जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना माहीती देवुन गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे बाबुराव हरीभाऊ शिंदे (रा. वाळवणे,सुपा,ता.पारनेर, जिल्हा-अहिल्यानगर) यांची माहीती देवुन त्याचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांनी शहर विभागातील प्रभारी अधिकारी यांना अलर्ट करुन अहिल्यानगर शहरात आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना केल्या. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब व गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांनी नमुद आरोपीताचा पोलीस स्टेशनल हद्दीत शोध घेत असताना तो अमरधाम रोड, अहिल्यानगर परिसरात आला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली.त्यांनी गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांना सदर परिसरात आरोपीचे शोधकामी पाठविले असता नमुद आरोपी हा गाडगीळ पटांगण,अमरधाम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी मिळुन आला आहे.त्याबाबत वरिष्ठ अधिकारी तसेच सुपा पोलीस स्टेशनला संपर्क करुन माहीती दिली.
नमुद आरोपीतास कोतवाली पोलीस स्टेशन येथुन सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरिता देण्यात आले आहे.नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.योगिता कोकाटे,पो.उप.निरी.गणेश देशमुख,पो.हे.कॉ.विशाल दळवी, संदिप पितळे,योगेश भिंगारदिवे, मपोहेकॉ/रोहीणी दरंदले,पो.कॉ. दिपक रोहोकले,तानाजी पवार, महेश पवार,अभय कदम,सुरज कदम,अमोल गाडे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु यांनी केली आहे.