पुणे (प्रतिनिधी):- सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी अहोरात्र झटणाऱ्या 1992 अखंड मैत्री ग्रुपच्या संस्थापक सदस्या तसेच राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेच्या निरीक्षक सौ.जयश्री घावटे ठुबे यांना महिला सुरक्षा संघटनेच्या वतीने ‘राष्ट्रीय महिला रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे केंद्र सरकारच्या विशेष वकील मधु हुकुमाणी व नागपूर युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांच्या हस्ते रविवार दि.23 मार्च रोजी प्रदान करण्यात आला.यावेळी 1992 अखंड मैत्री ग्रुपच्या वतीने सौ. जयश्री घावटे ठुबे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.