संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-जागतिक वन दिनानिमित्त नेहरू युवा केंद्राच्या वतीने चिंचोली गुरव येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संतोष रहाटळ सर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.रहाटळ यांनी विद्यालयीन युवक युवतींना मार्गदर्शन करताना वृक्षांचे महत्त्व,जलसंवर्धन,पर्यावरण संवर्धन,वृक्षतोड,वन्यजीव आणि वनीकरण याबाबत महत्व सांगीतले.त्यांनी युवकांना प्रेरित करत वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकी दहा झाडे लावण्याचा नवीन उपक्रम सुरू करण्याची सूचना केली.
कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अडांगळे सर यांनीही युवकांना जागतिक वन दिनानिमित्त मार्गदर्शन केले.नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका तृप्ती मोकळ यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष रोप भेट देऊन वनीकरण दिनाचे महत्त्व सांगितले.नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढत आहे.
सोबतच या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाबद्दलची संवेदनशीलता वाढविण्यात मदत होईल,अशी उपस्थितांकडून भावना व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमात विद्यालयाचे शिक्षक श्री मेंगाळ सर,श्रीमती. ठोकळ मॅडम,श्रीमती गभाले मॅडम,श्री मंडलिक सर आणि श्री पडवळे सर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.