अहिल्यानगर (प्रतिनिधी):-प्रवासी वाहतुक चालक झाला जबरी चोरी करणारा चोरटा जबरी चोरीच्या गन्हयातील 1 लाख 52.500/- रु.कि.चे सोन्याचे दागिने, मोबाईल,रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले 11.00.000/- रु. किं. चे वाहन असा एकण-12,52,500/- रु.कि.चा मद्देमाल हस्तगत करण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.
दि.23 मार्च 2025 रोजी महिला नामे अनुराधा सोमेश्वर जगदाळे (रा.लोनार गल्ली, सर्जेपुरा अहिल्यानगर) या महिला शिक्रापुर येथून खाजगी प्रवासी वाहन मारुती सुझुकी इरटिगा गाडीने अहिल्यानगर येथे येत होत्या.गाडी चालक याने शिक्रापुर येथुन प्रवासी भरुन अहिल्यानगर येथे येत असताना प्रवासी यांना त्यांचे नियोजीत जागी पोहोच केले.तसेच महिला नामे अनुराधा जगदाळे यांना दुपारी 01.00 वा. चे सुमारास पुणे बस स्थानक समोर स्वस्तीक चौक,अहिल्यानगर येथे उत्तरायचे होते.शेवट त्या महिला एकट्याच गाडीत होत्या.त्याचा फायदा घेवुन गाडी चालकाने त्याची गाडी स्वस्तीक चौकात थांबवुन महिला नामे अनुराधा जगदाळे यांचे गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने ओढुन घेतले व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांची गाडीतील पर्स त्यातील सॅमसंग मोबाईल फोन व रोख रक्कम 2500/- सह त्यांना परत न करता गाडीतून त्यांना धक्का मारुन खाली ढकलुन दिले व गाडी चांदणी बौक,अहिल्यानगर या दिशेने भरधाव वेगात घेवून निघुन गेला.
सदर घटनेमुळे महिला ही घाबरुन गेली व थेट सदर घटनेची तक्रार करण्याकरिता कोतवाली पोलीस स्टेशन येथे आली,गुन्ह्याची प्राथमिक माहीती घेवुन पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना घटणा ठिकाणी रवाना केले.घटणा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषनातुन मारुती सुझुकी इरटिगा गाडीचा नंबर एम.एच.28.बी.डब्लू.9632 यी माहोती प्राप्त करुन त्याबाबत गोपणीय बातमीदार यांना सतर्क केले.नमूद ईरटीका गाडी ही भरधाव वेगाने छत्रपती संभाजी नगर दिशेने गेल्याची माहीती मिळाले वरुन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी छत्रपती संभाजी नगर जाणारे रोडवरील पोलीस स्टेशन तसेच गोपणीय बातमीदार यांना माहीती देवून ते स्वतः पोलीस पथकासह रवाना झाले. गुन्ह्यातील इरटिंगा गाडी ही पांढरीपुल पास करित असताना घाटातच पोलीस पथकाने पाठलाग करुन सदर गाडीस थांबवून चालकास पोलीसांची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन अशोक गोसावी, रा. चिखली, जिल्हा- बुलढाना असे असल्याचे सांगितले,त्याचेकडे अधिक चौकशी केली असता नमुद गाडीत पाठीमागील शिटवर तक्रारदार महिला हि पर्स त्यातील मोबाईल व रोख रकमेसह मिळून आली. त्याबाबत चालक नितीन अशोक गोसावी यास विचारणा केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. त्यावरुन त्यास त्याचे ताब्यातील गाडीसह ताब्यात घेवून कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे आणण्यात आले.दरम्यान तक्रारदार महिला अनुराधा जगदाळे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 261/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 351(3) प्रमाणे 18.24 वा. गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.इरटिगा गाडी चालकास पहाताच तक्रारदार महिलेने त्यास ओळखून याने मला त्याचे गाडीतून माझे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन घेवून तसेच माझी पर्स त्यातील मोबाईल व पैशासह गाडीतुन परत न करता निघून गेला असल्याचे सांगितले.
गुन्ह्याचे तपास अधिकारी पोउपनिरी गणेश देशमुख यांनी पंचासमक्ष नमूद इसमाची झडती घेवुन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील गेला माल 1) 1,40,000/- रु किं. चे दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, 2) 10,000/- रु कि.चा सॅमसंग मोबाईल फोन, 3) 2,500/- रु रोख यासह आरोपी ने गुन्ह्यात वापरलेली 11,00,000/- रु कि.चे माठती इरटिगा गाडी नं. एम.एच.28.बी.डब्लू. 9632 होसह एकून 12,52,500/- रु कि.चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोउपनिरी गणेश देशमुख हे करित आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.योगिता कोकाटे,पो.उप.निरी. गणेश देशमुख, कृष्णकुमार सेदवाड, कैलास कपिले,पो.हे.कॉ.विशाल दळवी,संदिप पितळे,सलिम शेख,पो.कॉ.दिपक रोहोकले, तानाजी पवार,सुरज कदम, सोमनाथ केकान,महेश पवार, सचिन लोळगे,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,राम हंडाळ, अमोल गाडे,सोमनाथ राऊत, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु यांनी केली आहे.