अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आर.टी.ओ अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरीचा तोफखाना पोलिसांनी चार तासातच पर्दाफाश केला.बातमीची हकीगत अशी की, दि.२२ मार्च २०२५ रोजी फिर्यादी संकेत सुनिल मारवाडी हे त्यांच्या मित्रासह दि.२२ मार्च २०२५ रोजी सांयकाळी ०५/०० वा ते ०६/०० वा.चे सुमारास त्यांच्या मित्रासह एस डी स्पोर्टस क्लब स्विमिंग पुल तपोवनरोड येथे पोहण्याकरिता गेले होते. त्यांनी त्याचे कपडे व गळ्यातील सोन्याची चैन एका बॅगमध्ये चेजिंग रुमध्ये काढून ठेवली होती.सदर सोन्याची चैन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत तोफखाना पो.स्टे येथे गुन्हा रजि नं. ३१९/२०२५ बी.एन.एस ३३१(३), ३०५ (अ) अन्वये दि. २२/०३/२०२५ रोजी १३/०० वा अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि. उज्वलसिंह राजपुत व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना टिकाणी जावुन स्विमिंग पुल येथे जावुन घटनेच्या वेळी पोहण्यासाठी आलेला संशईत मुलगा नामे विवेक विजय वहाडणे (रा.अंबिकानगर, केडगांव,ता.जि अहिल्यानगर) याच्याकडे विचारपुस केली असता प्रथम त्याने गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही, परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन स्विमिंग पुलच्या लॉकर रूम मधुन हात चलाखी करुन चोरलेली फिर्यादी यांची दिड तोळा वजनाची सोन्याची चैन राहत्या घरातील बुटामध्ये ठेवल्याचे सांगुन काढून दिल्याने ती गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. योगेश चव्हाण हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे, सपोनि.उज्वलसिह राजपुत गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ.सुनिल शिरसाट,सुनिल चव्हाण,योगेश चव्हाण,सुधीर खाडे,पोकॉ.सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे,सतिष भवर,महेश पाखरे सर्व नेम-तोफखाना यांनी केली आहे.