सोलापूर (प्रतिनिधी):-बंजारा हे भारतातील भटक्या आदिवासी गटांपैकी एक आहेत.बंजारा हिंदू धर्माचे पालन करतात आणि त्यांना भारताचे जिप्सी म्हणून ही ओळखले जाते.बंजारा लोकांच्या वसाहतींना तांडा म्हणून ओळखले जाते जे संपूर्ण भारतात पसरलेले आहेत. सहसा,तांडा नदी,तलाव,विहीर इत्यादी जलाशयाजवळ राहतात.
राज्याचे जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव तांडा येथे भेट दिली.यावेळी तांड्यामधील नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळेस संदीप राठोड, सोलापूर बंजारा सेना जिल्हाध्यक्षा तथा भाजपा चिटणीस सुरेखाताई राठोड, शिवाजी राठोड व सर्व तांड्यातील गावकरी मोठ्या सहभागी होते.