नगर (प्रतिनिधी):-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त केडगाव येथील शाहूनगर मधील श्री छत्रपती शाहु कला,क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक मंडळ ( ट्रस्ट ) व शिव प्रेमी मुस्लीम मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने ” सावली ” संस्थेतील मुलांना शालेय शिक्षणासाठी लागणारे वह्या- पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले की,शिका संघटित व्हा संघर्ष करा’ हा जो मूलमंत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला यात आजही ऊर्जा आहे.तसेंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाला प्रचंड महत्त्व दिले व त्याचं शिक्षणाच्या जोरावर आज जगात त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणुन ओळखल म्हणुन त्यांची जयंती आज वह्या पुस्तकं वाटून साजरी करीत आहोत.या वेळी महेश सोले,प्रकाश बिडकर,ॲड.विजय महाजन,दूर्वेश शेलार,संदेश बारसे,विशाल पाचरणे,जॅकी काकडे,समीर शेख,शफीक पठाण,मौलाना रिझवान खान, निजाम शेख व संस्थेचे श्री. नितीन बनसोडे उपस्थितीत होते.