अहिल्यानगर (प्रतिनिधी):-झेंडिगेट येथे कत्तलीकरिता आणलेल्या 9 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.अल्ताफ खलील कुरेशी व अरताफ अल्ताफ कुरेशी असे गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,झेंडिगेट येथे नऊ गोवंशीय जनावर कत्तलीसाठी आणणार आहेत.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी पोलीस पथकाला सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून नऊ गोवंशिय जनावरांची सुटका केली.अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज इनामदार हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगरशहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस अंमलदार विशाल दळवी संदीप पितळे रोहिणी दरंदले दीपक रोहकले तानाजी पवार सुरज कदम अभय कदम शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर राम हंडाळ सचिन लोळगे सोमनाथ केकान सोमनाथ राऊत महेश पवार प्रतिभा नागरे यांनी केली आहे.