संगमनेर (प्रतिनिधी):-संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला नजीक असणाऱ्या लोणी-नांदूर शिंगोटे हायवेवर चौफुली जवळ सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याकारणाने सदर ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी एक महिन्यापूर्वी संबंधित महामार्ग प्रशासनाकडे केली होती.
वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी संबंधित विभागाकडे केला होता.याची दखल घेत महामार्ग प्रशासनाने दोन्ही बाजूला रबरी गतिरोधक टाकले आहेत.याबद्दल प्रशासनाचे पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी आभार व्यक्त केले आहे तर दत्तात्रय घोलप यांचे यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच समाजसेवक आदित्य घाडगे,गणेश पाडेकर,विजय दिघे,सोमनाथ नेटके यांनी अभिनंदन करत समाजसेवेच्या कार्याचे कौतुक केले आहे.पुढील काळात दत्तात्रय घोलप यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी यावेळी प्रशासनाचे आभार व्यक्त केले असुन,संबंधित महामार्ग अहिल्यानगर विभागाचे अभियंता अनिल गोरडे यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे.