अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील शिर्डी येथील 16 अवैध व्यावसायिकांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीकडून 2 लाख 02,360/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दि 06 मे 2025 रोजी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेते व अवैध जुगार चालविणाऱ्या इसमांची माहिती काढुन,पंचासमक्ष 16 वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन अवैध व्यावसायिकांविरूध्द कारवाई केली.

त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगारबंदी कायदयान्वये 7 व महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये 9 असे एकुण 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 2,02,360/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी,स्थानिक गुन्हे शाखा पोनि. श्री दिनेश आहेर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे,विशाल तनपुरे, रणजीत जाधव,अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ यांनी केलेली आहे.