नगर प्रतिनिधी (ॲड.प्रवीण तांबे):-अहिल्यानगर शहरातील सावेडी येथील डॉन बॉस्को माध्यमिक विद्यालय शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा जुन्या आठवणींना उजाळा देत हास्य, विनोद, व विविध गुणदर्शन दाखवत रंगला २००६-२००७ या वर्षातील अठरावर्षा नंतर विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा,
आपल्या गुरुप्रती आदरभाव व्यक्त करत अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगता मधून दाटून आलेल्या उत्कठ भावनांना वाट मोकळी करून देत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे पर्यवेक्षक श्री. फ्रान्सिस पाटोळे सर हे होते.यावेळी विचार मंचावर शाळेचे आदर्श मुख्याध्यापक फादर अजित, श्री पॉल भिंगारदिवे सर, श्री रत्नाकर जाधव सर, श्री कसाब सर, श्री विल्यम सर,श्री भालेराव सर, श्री रवी मुंतोडे सर, श्री ब्राह्मणे सर ,सौ प्रिया साठे मॅडम,श्री मनिषा शिंदे मॅडम,खरात मावशी व पेत्रस जाधव मामा आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व शिक्षकांचा,ट्रॉफी,बुके, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.आपल्या गुरु विषयी शाळेत असताना जी आदरयुक्त भीती होती ती आजही कायम असल्याचे विद्यार्थ्याने आपल्या भाषणात सांगितले. गुरु हे शिक्षण देत नसून ज्ञानाचा चिरंतन ठेवा देत असतात ती प्रत्येकाच्या आयुष्याची पुंजी म्हणून प्रत्येकाला पुरेल एवढे ज्ञान देत असतात. शाळा चांगली असली म्हणजे विद्यार्थी शिकतातच असं नाही तर, विद्यार्थी चांगले असेल तर ते कुठल्याही शाळेमध्ये शिकू शकतात, तसेच अवांतर अभ्यासाची साधने नाहीत, पालक हा ग्रामीण भागातला शेतकरी असून तरीही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग शाळेमध्ये पाहायला मिळतो तसेच अनेक ग्रामपंचायत अधिकारी,शिक्षक, वकील, शास्रज्ञ , इंजिनिअर ,तलाठी,आदर्श प्रगतशील शेतकरी,उत्तम व्यवसाय , राष्ट्रीयकृत बँक मॅनेजर, चित्रपट दिग्दर्शन, डॉक्टर , नामांकित न्युज रिपोर्टर पर्यंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे शिक्षक म्हणून आम्ही धन्य झालो. डॉन बॉस्को माध्यमिक विद्यालय म्हणजे एक ब्रँड आहे… अशा शब्दात श्री पाटोळे सर यांनी अध्यक्षीय भाषणांमधून आपली भावना व्यक्त केली तर फादर अजित, श्री पॉल भिंगारदिवे सर, श्री रत्नाकर जाधव सर, श्री कसाब सर, श्री विल्यम सर,श्री भालेराव सर, श्री रवी मुंतोडे सर, श्री ब्राह्मणे सर ,सौ प्रिया साठे मॅडम,श्री मनिषा शिंदे मॅडम,खरात मावशी व पेत्रस जाधव मामा यांनी भाषणांमधून आपल्या भावना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून सरांचे मनस्वी अभिनंदन करत आपल्या गुरु विषयी आदरभाव व्यक्त केला. माजी विद्यार्थी प्राजक्ता कडमधाड, आकाश म्हकाळे, चेतन कांबळे, नितीन त्रिभुवन, अनुजा लाकूडझोडे इ.माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा व्यासपीठवर उपस्थित सर्व शिक्षकांच्या ट्रॉफी ,गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी श्री संतोष पाटोळे, ॲड.अनुजा लाकूडझोडे,ॲड.ज्ञानेश्वर पाडेकर,श्री.अशोक लकडे श्री. आकाश म्हकाळे,श्री. अक्षय कदम यांनी घेऊन नियोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्या मुळे नियोजनबद्ध कार्यकमाची चर्चा सर्वत्र होत आहे. १८ वर्षा नंतर झालेला स्नेह मेळावा शिक्षक व माजी विद्यार्थ्यांयांचे उपस्थित आनंदीय वातावरणात पार पडला.कार्यक्रम मध्ये संगीत खुर्ची कार्यक्रमाचे आयोजन केले होत त्यामध्ये मुली मधून प्रथम क्रमाक रेशमा गायकवाड त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गुरुजनवर्गामधून मधून प्रथम क्रमाक सौ मनीषा शिंदे मॅडम यांनी पटकावला त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाच्या रुचकर व स्वादिष्ट स्नेहभोजनाची मेजवानी ॲड.श्री ज्ञानेश्वर पाडेकर व श्री अशोक लकडे यांच्यातर्फे देण्यात आली.या कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना सौ अनुजा लाकूडझोडे यांनी मांडली तर श्री आप्पासाहेब माकोणे यांनी अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन दिले. कार्यक्रमाची प्रस्ताविक व संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ॲड.सौ अनुजा लाकूडझोडे, आशिष सूर्यवंशी, आप्पासाहेब माकोणे यांनी केले.