अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दोन दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून या आरोपीकडून 1 लाख 19,000/-रू.किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल करण्यात पथकाला मोठे यश आले आहे.

बातमीची हकिगत अशी की,दि.18 मे 2025 रोजी फिर्यादी किरण विश्वनाथ खैरे, (रा.भोरवाडी,ता.अहिल्यानगर) हे कुटूंबियासह घरात झोपले असताना अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून,कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेला.याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.441/2025 बीएनएस कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडी गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा राजेश अशोक काळे (रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर,जि.अहिल्यानगर) याने त्याचे साथीदारासह केल्याची असुन तो सध्या राहते घरी असल्याची माहिती मिळाली.पथकाने आरोपीचा राहते घरी जाऊन शोध घेऊन 1) राजेश अशोक काळे, वय 24, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने मागील चार ते पाच दिवसापुर्वी भोरवाडी गावचे शिवारात 2) राहुल चंदर भोसले, रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर (फरार) व 3) प्रदीप उर्फ खुटल्या आरकास काळे,रा.रांजणगाव मशीद,ता.पारनेर, जि.अहिल्यानगर (फरार) याचेसह केल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपी राजेश अशोक काळे यास विश्वासात घेऊन,आणखी कोठे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील साथीदारासह निघोज, राळेगणसिध्दी,चिंचोली, वाडेगव्हाण ता.पारनेर व शिर्डी येथील घरफोडीचे गुन्हे केल्याची सांगीतले.ताब्यातील आरोपीकडे घरफोडी गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले दागीने हे बाबा किसन शेंडगे,रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा,ता.श्रीगोंदा यास विक्रीसाठी दिल्याची माहिती सांगीतली.त्यावरून पथकाने नमूद आरोपीचा शोध घेऊन पंचासमक्ष बाबा किसन शेंडगे, वय 60, रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून 1,19,000/- रू.किंमतीचे त्यात 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तपासकामी जप्त केले आहे.तसेच इतर चोरीचे सोन्याचे दागीने हे बेलवंडी,ता.श्रीगोंदा येथील सोनारास विक्री केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यात घेण्यात आलेल्या 02 आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग,श्री. दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर,मनोज लातुरकर,प्रशांत राठोड व मेघराज कोल्हे यांनी केलेली आहे.