सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार मनिषा जाधव यांना नारी शक्ती ग्लोबल पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी:- विरार येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच पत्रकार सौ.मनिषा जाधव यांना नारी शक्ती ग्लोबल पुरस्काराने जीवनधारा संघ या NGO च्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.दि.25 जून रोजी अंधेरी येथील मेयर हॉल येथे सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ.जाधव यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार याची आपल्या लेखणीतून वाचा फोडली व केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार शिवसेना महाराष्ट्र संघटक अवधेशजी शुक्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच पालघरच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे यांना ही हा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चांदिवलीचे आमदार श्री. दिलीप मामा लांडे हे होते.यावेळी सिनेसृष्टीतील स्विटी छाबडा व शिरीन फरीद हे कलाकार उपस्थित होते.जीवनधारा संघ या NGO च्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना ग्लोबल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यामुळे अजून जोमात सामाजिक काम करण्याची ऊर्जा वाढते असे सौ.मनीषा जाधव यांनी सांगितले.यावेळी जीवनधारा संघाच्या मासिकाचे अनावरण हि करण्यात आले.