आंबेडकर नगर परिसरात घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल..महिला सरपंच पतीची नागरिकांना भर पावसात बेघर करण्याची धमकी.. सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मिळवून देण्याची मागणी
पद्मा मोहोड वाशीम (प्रतिनिधी):- सध्या पावसाने राज्यभर थैमान घातले असून वाशिम जिल्ह्यातील जांब गावात आंबेडकर नगर परिसरात पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा शिरकाव झाल्याने जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत.या संदर्भात येथील नागरिक वर्षानुवर्षे शासनाच्या निदर्शनात ही बाब आणून देत आहेत परंतु याच्यावर कठोर अशी कोणतेही निर्णय शासन घेत नाही. येथील नागरिकांची शासन दिशाभूल करत आहे व खोटे आश्वासन देत आहेत.या संदर्भात नागरिकांची मीटिंग घेऊन येथील जांब गावातील महिला सरपंच व त्यांचे पती नागरिकांचे काहीही म्हणणे ऐकून न घेता उलट नागरिकांना तुम्हाला भर पावसात बेघर करू तुम्हाला मिटिंग मध्ये आम्ही बोलून देतो हे खूप आहे.अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या पदमा मोहोड व नागरिकांचा सर्वांसमक्ष अपमान केला.येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच महिला असून या महिलेचा पती ग्रामपंचायत मध्ये लुडबुड करून नागरिकांना अरेरावीची भाषा करून दमदाटी करत आहेत. तसेच सदरील इसम हा सरकारी नोकरदार असून त्याने असे करणे उचित नसून त्यांच्या विरोधात पुन्हा असे घडल्यास तक्रार अर्ज करणार असल्याचे सौ.मोहोड यांनी यावेळी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोड घडलेल्या या प्रकाराने व्यथित होऊन त्यांनी जिल्हाधिकारी यांना आम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी लेखी स्वरूपात मागणी केली आहे.