अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने मटका बुकिंवर छापा घालत 22 आरोपींवर कारवाई करत तब्बल 8 लाख 61 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनीर इमाम पठाण (वय.५५), अभिजीत ऋषभ मुथ्था (वय. ४०), सादिक शहाबुद्दीन शेख (वय ३०), आकाश कैलास पोटे (वय २४), अवधूत मारुती शिंदे (वय २३), लीलाजीत अर्जुन यादव (वय ३१), संदीप बाबुराव सूर्यवंशी (वय ४१), सचिन नंदकुमार गावडे (वय ३७), सागर सुरेश बनगे (वय ३०), शाहरुख चांदखास (वय २८), किसन म्हसू शिंदे (वय ७०), महेश रामकृष्ण पवार (वय ४५), विक्रांत रवींद्र लोखंडे (वय ३५), राहुल कैलास चौधरी (वय ३०), ललित नामदेव तांबे (वय २९), राजू दिनकर ताभाडे (वय ५६), मंजूर सवीर सय्यद (वय ३६), ख्वाज़ा खान सद्दारदारखान पठाण (वय ४८), स्वप्निल नामदेव तांबे (वय ३२), नामदेव रंगनाथ गोंधरे (वय ४५), नसरुद्दीन मल्लाउद्दीन शेख (वय ६०), अल्ताफ उरामण शेख (वय ६२), अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,पोसई राजेंद्र वाघ,सफो/शकील शेख पोहेकों/शंकर चौधरी,पोहेकों/अजय साठे,पोहेकों/अरविंद भिंगारदिवे,पोहेकों/मल्लिकार्जुन बनकर,पोहेकों/दिनेश मोरे, पोहेकॉ/उमेश खेडकर,पोहेकों/सुनिल पवार,पोकों/सुनिल दिघे, पोकों/अमोल कांबळे,पोकों/विजय ढाकणे,पोकों/दिपक जाधव,पोकों/जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली.