खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन,पोलीस असे लिहून महाराष्ट्र शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत असल्याने त्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करावी-सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सर्रास पणे अनेक खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन,पोलीस असे लिहून महाराष्ट्र शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत असल्याने त्या गाड्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.मोटार वाहन अधिनियम 1988 व इतर तदनुषंगिक नियमातील तरतुदी नुसार खाजगी वाहणावर महाराष्ट्र शासन अगर पोलीस लिहिणे बेकायदेशीर आहे व असा नियम असून याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असूनही कोणी कारवाई करीत नाही या समजूतीने सर्रास पणे खाजगी दुचाकी व चार चाकी या गाड्याचे नंबर प्लेट वर महाराष्ट्र शासन व पोलीस लिहिलेले आढळून येते व याचा गैरफायदा अनेक टोल नाक्यावर टोल बुडविण्यासाठी शासनाची गाडी म्हणून टोल वाचवण्याचे प्रयत्न ही करीत असल्याचे प्रखरतेने जाणवते.
या साठी मोटार वाहन निरीक्षकांनी कायदेशीर अंमलबजावणी करावी अशी मागणी बोज्जा यांनी केली आहे.विशेष बाब म्हणजे पोलीस कारवाई करीत नाही म्हणून अनेक वाहनाचा पोलीस अगर महाराष्ट्र शासनाचा कोणताही संबंध नसतानाही असे नावे लिहिल्याचे निदर्शनास आले व या बाबत अधिक चौकशी केली असता गाडी पूर्वी पोलिसांची होती, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याची होती म्हणून नाव तसेच ठेवण्यात आल्याचे कळले सदर बाबही गंभीर आहे.अनेक वाहनाच्या नंबर प्लेट व वाहनावर नोटरी पब्लिक भारत सरकार, वकील असेही लिहिल्याचे निदर्शनास आलेले आहे असे लिहिणे कायदेशीर आहे का? मोटार वाहन कायद्या प्रमाणे योग्य आहे का? जर नसेल तर या वाहणावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.