धारदार तलवार बाळगणा-याला भिंगार कॅम्प पोलीसांनी घेतले ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि,एक इसम सिक्रेट हार्ट कॉन्व्हेट शाळेजवळ येथे तलवारी विक्री करणेसाठी येणार आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाली तात्काळ सपोनि.मुलगीर यांनी सदर ठिकाणी कारवाई करणेबाबत पोलिसांना आदेशित केल्याने पोलीस अंमलदार दिपक शिंदे यांनी दोन पंचाना बोलावुन घेऊन त्यांना हकीगत समजावुन सांगुन बातमीतील नमुद ठिकाणी सापळा लावला असता थोड्या वेळातच बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम संशतियपणे एक प्लॅस्टीकची गोणी घेवुन सिक्रेट हार्ट कॉन्व्हेट शाळेजवळ भिंतीलगत वडाच्या झाडाखाली आला असता त्या संशयित इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जात एक लोखंडी धारधार तलवार लाकडी मुठ असलेली मिळुन आल्याने संशयित इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावं अमोल महादेव सुडके वय २८ वर्ष रा, सुडके मळा बालिकाश्रम रोड ता.जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितल्याने सदर इसमा विरुध्द कॅम्प पोलीस स्टेशन गुरनं.-३७३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,मपोसई वाघ,पोलीस अंमलदार,दिपक शिंदे,रवी टकले प्रमोद लहारे यांनी केली आहे.