महिला सरपंच व पतीची दादागिरी सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोड यांना जीवे मारण्याची धमकी..एकच खळबळ..पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल
वाशिम (प्रतिनिधी):-वाशिम जिल्ह्यातील नवीन सोनकास गावात आंबेडकर नगर परिसरात पावसाने नागरिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा शिरकाव झाल्याने जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत.या संदर्भात येथील नागरिक वर्षानुवर्षे शासनाच्या निदर्शनात ही बाब आणून देत आहेत परंतु याच्यावर कठोर अशी कोणतेही निर्णय शासन घेत नाही. येथील नागरिकांची शासन दिशाभूल करत आहे व खोटे आश्वासन देत आहेत.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या पदमा मोहोड या गावकऱ्यांसह सरपंच सुनिता अजय खिराडे यांच्याकडे नागरिकांसह पावसाचे पाणी घरामध्ये शिरले आहे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे याबाबत समस्या मांडण्याकरता गेल्या असता यावेळी सरपंच सुनीता अजय खिराडे व त्यांचे पती अजय खिराडे यांनी पद्मा मोहोड यांना कुणी मेलं तर नाही ना तुम्हाला मी पाहून घेतो,असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात एनसी क्र/2025 कलम 351(2), 351(3),(3)5 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.