तोफखाना व भिंगार पोलिसांची संयुक्त कारवाई तब्बल ९ लाख ५०,००० रुपये किमतीच्या महागड्या मोटारसायकल हस्तगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तोफखाना पोलीस स्टेशन येथील गुरनं ६०७/२०२५ बीएनएस कलम ३०५ ब प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे शुभम ज्ञानेश्वर कोडम रा. ईसकॉन मंदिराचे जवळ हे फिटर काम करत असुन त्यांच्या गॅरेजमधुन कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मोटार सायकली चोरी करुन घेवुन गेले असल्याच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे तपासात तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांनी तपास पथकास सुचना दिल्या त्यांचे सुचनेवरुन तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन आरोपी नामे अनिकेत बाबासाहेब कर्जुले (वय २३ वर्षे राहणार मोकाशे वस्ती वाणीनगर अहिल्यानगर) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलूबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि.श्री.आनंद कोकरे,सपोनि.जगदीश मुलगीर,पोहेकॉ.बाळासाहेब गिरी,योगेश चव्हाण,दिपक गांगर्डे,सुजय हिवाळे,कपील गायकवाड,बाळासाहेब भापसे,सतीष भवर,सतीष त्रिभुवन,महेश पाखरे तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार संदिप घोडके,दिपक शिंदे,रवि टकले,बापुसाहेब म्हस्के,प्रमोद लहारे यांनी केली आहे.