गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणारा जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुकुंदनगर भागात दर्गा दायरा रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम गोवंशय जातीच्या जनावरांचे गोमांस विक्री करीत आहे. आत्ता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांनी कॅम्प पोलीस स्टेशन मधील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्यास आदेशित केल्याने लागलीच तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता नसीर बाबू कुरेशी राहणार नगर या इसमाच्या ताब्यात गोवंशय जातीच्या जनावरांचे 2,12,700 रू. किमतीचे गोमास विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असतानाही मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार अजय गव्हाणे,दीपक शिंदे,रवी टकले,पांडुरंग बारगजे, प्रमोद लहारे,पोटे यांनी केली आहे.