सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई लोखंडे राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
(प्रतिनिधी):-परतूर -जालना जिल्ह्यातील सत्यशोधक लहुजी क्रांती संघाच्या संस्थापक अध्यक्षा नंदाताई लोखंडे यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नंदाताई लोखंडे यांनी आतापर्यन्त महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेर सुद्धा आतापर्यंत महापुरुषांच्या विचारावर आधारित हजारो व्याख्याने दिली आहेत.
तसेच त्यांनी बहुजन समाजावर झालेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात परखड भूमिका घेऊन अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या विचारधारेवर कार्य करण्याच्या त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊनच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने नांदेड येथील अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि २६ जून रोजी नांदेड येथील रुबी हॉटेल येथील आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांस अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक अध्यक्ष बा रा वाघमारे, पॅन्थर नेते भाई रमेश खंडागळे, प्रा. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.