क्षमतेपेक्षा जास्त शाळेतील विद्यार्थ्यांची रिक्षात वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी तसेच मुदत संपलेल्या रिक्षा व शाळेत विदयार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करत 12 रिक्षा पकडून कारवाईसाठी मा. न्यायालयाकडे पाठवल्या आहे.
या रिक्षा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी आरटीओ परमिट न घेता अवैधरित्या वाहतूक करत होत्या.तसेच मुदत संपलेल्या 32 रिक्षा ज्यांना स्क्रॅपमध्ये आरटीओ विभागाकडून परमिशन काढणे आवश्यक आहे अशा 32 रिक्षा डिटेन करून पुढील कारवाई करिता आरटीओ विभागाकडे पाठवण्यात आल्या असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी दिली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.बाबासाहेब बोरसे,psi परदेशी,psi गवळी,psi घायतडक,psi गायकवाड,Asi मन्सूर,Asi इनामदार,Asi अन्सार शेख,हवं गिऱ्हे,Hc खेडकर,Hcमुस्ताक शेख,Npc जावेद शेख,पिकं ससे,PC काळे,Pc शेटे,pc छगन दहिफळे,यांनी केली आहे.