ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांचा प्रताप सोशल मीडियाद्वारे कर्मचारी महिलेस कार्यमुक्त करण्याचा आदेश…तीन दिवसांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिला कर्मचाऱ्याचे चिमुकलीसह आमरण उपोषण सुरु..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे गेल्या तीन दिवसापासुन प्रयोग शाळा तंत्रज्ञ महिला कर्मचारी सत्यशीला मोरे या आपल्या चिमुकलीसह उपोषण करीत आहे.उपोषणकर्त्या सौ.मोरे यांना दोन महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे कार्यमुक्त करण्याचा आदेश ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गुट्टे यांनी दिला होता.याच अन्यायाला विरोध करून मोरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे निवेदने देऊन खुलासा करण्याची मागणी केली होती.
पण संबंधित अधिकारी हे फक्त उडवाउडवीची व असमाधान कारक उत्तर देत होते.तसेच सदरील प्रकरण हे आमच्या अंतर्गत नाही असे बोलून दुसर्या अधिकाऱ्यावर सोपवत होते. त्यावेळी सत्यशीला मोरे यांनी उपोषण करण्याचा इशारा मागील महिन्यात प्रसार माध्यमे व पत्रव्यवहार द्वारे दिला होता. पूर्ण महिना उलटून गेला तरी चौकशी किंवा समाधान कारक उत्तर मिळाले नाही.अखेर न्याय न मिळाल्याने 30 जून रोजी महिला कर्मचारी उपोषणाला आपल्या लहान मुलीसह बसल्या पण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांनी प्रसार माध्यमद्वारे या प्रकरणातून पळवाट काढत सांगितले आम्ही वरीष्ठ अधिकार्यांना सांगितले आहे.तसेच उपोषणाच्या दुसर्या दिवशी रात्रीच्या वेळी दोन कर्मचारी पाठून 1 जुलै 2025 पासून कार्यमुक्त करत आहे. असा आदेश पाठवला पण स्वतः अधीक्षक आले नाही.उपोषण हे कार्यावर रुजू करण्यासाठी होते याचा विसर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना पडला असे एकूण दिसून येते.
जर एक जुलै 2025 रोजी कार्यमुक्त अर्ज देत आहे तर गेल्या तीन महिन्यापासून कामावर येऊ दिले नाही. मानसिक त्रास दिला.वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना भेटण्यासाठी प्रवृत्त केले मग ते काय होते..? उपोषण च्या दुसर्या दिवशी कार्यमुक्त करत असेल तर मागील 3 महिन्याचे काय..? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला.ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथील होणार्या गैरव्यवहार विरोधात आवाज उठल्यामुळे तसेच महिला कर्मचारी अनुसूचित जाती मधून येत असल्यामुळे जाणूनबुजून सुडबुद्धीने टार्गेट करत आहे.डॉ. गुट्टे यांच्या मागचा मास्टर माइंड कोण याचा खुलासा व्हावा अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये होत आहे.