वज्रदेही महिला विकास संघ आक्रमक..तहसील कार्यालयातील लिपिक अजय खिराडेला बडतर्फ करा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..तो कर्मचारी नाही तर गुंडगिरी करणारा हुकूमशहा-अध्यक्ष आरतीदीदी ठोके
वाशीम (प्रतिनिधी):-भारतीय संविधानाने महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषाप्रमाणे समान हक्क दिला आहे.महिला सुद्धा कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा कमी नाही आणि त्यामुळे शैक्षणिक असो किंवा राजकीय क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आणि त्यामुळेच महिला आज राजकीय क्षेत्रात चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत.परंतु अजूनही काही ठिकाणी नावापुरत्याच महिला कार्य करतात असे दिसत आहे.मंगरुपिर तालुक्यातील जांब येथील सरपंच पदावर कार्यरत असलेल्या महिला सरपंचाला तिच्या पतीकडून स्वतः तो सरपंच असल्यासारखे वागून तिला तो बाजूला सारत आहे त्यामुळे सरपंच पदाचे उल्लंघन होत आहे.
मंगरूपिर तालुक्यातील आंबेडकर नगर येथील नवीन सोनखास आयटीआय कॉलेज परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून घरात पाणी घुसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी जांब गट ग्रामपंचायतकडे मदतीसाठी धाव घेतली असता,सरपंच सुनीता खिराडे यांचे पती मंगरूळपीर तहसील कार्यालयातील लिपिक अजय खिराडे यांनी नागरिकांना मदती ऐवजी जीवे मारण्याची उघड धमकी दिली. “तुम्हाला जे काय करायचे असेल ते करा… मी तहसीलदार साहेबांचा राईट हॅन्ड आहे..” अशी उलट भाषा वापरत त्यांनी राजकीय दायित्वाची चेष्टा केली.शासनाची नोकरी करत असलेल्या एखाद्या कर्मचारी जर अशी भाषा वापरत असेल,तर तो कर्मचारी नाही गुंडागिरी करणारा शासकीय हुकूमशहा आहे.
यावेळी वज्रदेही महिला विकास संघाच्या वतीने वाशीम जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की,जांब गट ग्रामपंचायत येथील महिला सरपंच सुनिता खिराडे यांचे पती अजय खिराडे ( शासकीय नोकरदार तहसीलदार लिपीक) यांच्यावर तातडीने निलंबन व बडतर्फ ची कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील महिला संघटना रस्त्यावर उतरतील आणि त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी यावेळी वज्रदेही विकास संघाच्या संस्थापक अध्यक्षा आरतीदीदी ठोके,ऍडव्होकेट पराग गवई यांच्यासह संघटनेच्या अनेक महिला उपस्थित होत्या.