अवैधरित्या मावा बनविणाऱ्या कारखान्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौकाजवळील संदेश नगर येथील अवैधरित्या मावा बनवणाऱ्या टपरीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकत मोठ्या प्रमाणात मावा जप्त केला आहे.
तसेच टपरीच्या मागे असलेल्या घरात मावा तयार करण्यासाठी लागणाऱ्या दोन मशीन,सुगंधी तंबाखू,सुपारी असा अंदाजे जवळपास 3 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात 4 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,पोसई/राजेंद्र वाघ,सफो/शकील शेख,पोहेकॉ.शंकर चौधरी,अजय साठे,दिगंबर कारखिले,मल्लीकार्जुन बनकर,दिनेश मोरे,अरविंद भिंगारदिवे,उमेश खेडकर,सुनिल पवार,सुनिल दिघे,अमोल कांबळे,जालिंदर दहिफळे,दिपक जाधव,विजय ढाकणे यांनी केली आहे.