संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-गुरुवार दि.०३जुलै २०२५ रोजी हिवरगाव पावसाचे ग्रामपंचायत अधिकारी हरीष गडाख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.आनंदऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर यांच्या कडून मोफत नेत्र तपासणी व उपचार आणि प्रथम १०० नेत्र तपासणीधारकांना त्यांच्या आवश्यकते नुसार चष्मा साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.तसेच श्री.भानुदासजी डेरे आयुर्वेदिक हॉस्पिटल यांचेकडील तज्ञ डॉक्टरांन मार्फत सर्व रोग निदान व मोफत उपचार करण्यात येणार आहे.
हिवरगाव पावसाचे ग्रामपंचायत अधिकारी हरीष गडाख यांच्या वाढदिवसा निमित्त संगमनेर तालुक्यातील आधार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी सदर मोफत नेत्र तपासणी व उपचार पद्धतीचा व साहित्य वितरणाचा तसेच सर्व रोग निदान व मोफत उपचार पद्धतीचा व भव्य रक्तदान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे,केशव दवंगे यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी वर्ग,सर्व संस्था पदाधिकारी यांच्या सह ग्रामस्थ यांनी केले आहे.