ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केले अवघ्या बारा तासाच्या आतच जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जबरी चोरी करुन ट्रक चालकावर चाकुने हल्ला करुन लुटणा-या गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी अवघे बारा तासाच्या आत पकडले आहे.आरोपीच्या ताब्यातुन ७५,५०० /-रुपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशी की,फिर्यादी नामे बालाजी किसन इंगळे (वय-३३ वर्ष रा. कारेगव्हाण ता.जि.बीड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,अहिल्यानगर ते संभाजीनगर जाणारे रोडवर जेऊर येथे हॉटेल स्वागत येथे टोलनाक्याजवळ माझे ताब्यातील चौदा टायर महिंद्रा कंपनीचे गाडी नंबर एम एच ११ सी एच ९०३८ हिला चार अज्ञात इसमांनी मोपेड गाडी आडवी लावुन माझ्या गाडीमध्ये मध्ये चढुन मला मारहाण करुन गाडीचे खाली ओढुन त्यातील एका इसमाने त्याचे जवळील चाकुसारखे दिसणारे लांब हत्याराने माझ्या मानेवर वार करून माझे खिशातील रोख रक्कम १५,०००/-रु बळजबरीने काढुन घेवुन निघुन गेले.व मला लाथाबुक्यांनी मारहाण केली वैगरे दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे येथे गुरजि नंबर ४९९ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कायदा कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गोपनिय व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सपोनि.माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की,सदरील गुन्हा हा गुन्हेगार नामे धीरज उर्फ जॉकी जॉन आवारे (वय-१९ वर्ष रा.गणेश चौक बोल्हेगाव फाटा ता.जि.अहिल्यानगर) व त्याचे तीन साथीदारांनी मिळुन केला आहे.व सदरील आरोपी हे गांधीनगर भागात आहेत अशी माहिती मिळाल्याने तपास पथकातील अमंलदार यांना सदर ठिकाणी पाठविले. सदर आरोपी नामे धीरज उर्फ जॉकी जॉन आवारे वय-१९ वर्ष रा. गणेश चौक बोल्हेगाव फाटा ता जि अहिल्यानगर व तीन विधीसंर्घषित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांचेकडुन सदर गुन्हयात वापरलेली ६०,०००/- रु किमतीची स्कुटी नंबर एम एच १६ डी क्यु २०५६ व गुन्हयात चोरलेली रोख रक्कम १५,०००/- रुपये व ५००/-रु किमतीची लोखंडी कत्ती असा एकुण ७५,५०० /-रु मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अमोल भारती अति.चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांchya मार्गदर्शानाखाली सपोनि.माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस सटेशन, पोसई.मनोज मोंढे,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ.राजु सुद्रीक, पोहेकॉ.सचिन आडबल,पोहेकॉ. संदीपान पितळे,पोहेकॉ.शैलेश रोहोकले,पोकॉ.किशोर जाधव, पोकॉ.नवनाथ दहिफळे,पोकॉ. शिवाजी मारे,तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.