इथे सुरू होण्याआधीच संपते कहाणी….
अहिल्यानगर….
प्रिय आत्मीय,
16 वर्षांच्या शोभाची (बदललेले नाव) अहिल्यानगर जिल्ह्यातील एका घरातून मुक्तता केली तेव्हा सर्वजण हादरले.तिच्या वडिलांनी तिच्या आईची तिच्यासमोर हत्या केली. वडिलांवर कायद्याचा बडगा पडला . शोभा आणि भावंड पोरकी झाली. कुठलाही आधार नसल्याने तिला मामाने घरी नेले. त्यानंतर मामा आणि त्याच्या 3 मुलांकडून गेली 4 वर्ष तिच्यावर रोजच बलात्कार झाले. अनेकदा ती गर्भवती राहिली आणि तिचा गुपचूप गर्भपात या सर्वांनी केले.
मामा बाहेरख्याली असल्याने त्याने शोभाला तिच्या वयाच्या 15 व्या वर्षी एचआयव्ही बाधीत केले. हे ठाऊक नसल्याने मामाची बलात्कार करणारी 2 मुले देखील एच आय व्ही बाधीत झाली.स्नेहालय संस्थेत शोभासोबत तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संबंधी काम स्नेहालय टीमने सुरू केले. तिचे समुपदेशन तसेच कायदेशीर लढाईचे काम सुरू असतानाच एक नवे आव्हान निर्माण झाले.
शोभाच्या लहान आतड्याला तिढा पडला. तिला असह्य वेदना होत आहेत.शोभाला शस्त्रक्रियेची गरज असल्याने परिसरातील शासकीय आणि ट्रस्ट रुग्णालयाशी संपर्क करण्यात आला.तथापि शोभा हिला एच.आय. ची बाधा असल्याने कोणीही तयार झाले नाही. सुरभी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्याची तयारी डॉ. श्रीतेज जेजुरकर यांनी दाखविली. त्यासाठी खर्च अंदाजे 1,50,000/- ( एक लाख पन्नास हजार रुपये ) आहे.असहाय, अनाथ अत्याचार आणि शोषणग्रस्त शोभाला नवजीवन देण्यासाठी आर्थिक सहयोगाचे आवाहन स्नेहालयने केले आहे.
मदतीसाठी बँक खात्याचा तपशील.
Snehalaya’s SBI bank details.
Bank Name: State Bank of India
Branch name: MIDC Area, Nagapur ,Ahmednagar
Account Number : 35952926993
Name of Account (Cheque to be made in the name of): Snehalaya
9 digit MICR number:414002002
Current/ savings account: Current account
SWIFT Code/ Remittance Instructions SBap0}0000000ININBB507
RTGS/IFSC Code: SBIN0006040
आपली नम्र संगीता सानप स्नेहालय टीम संपर्क: 9011020178.