स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा…14 आरोपी ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर येथे जुगार खेळणाऱ्या 14 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत तब्बल 11,24,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीगत अशी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.त्या अनुषंगाने पोनि.श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केलेले होते.
तपास पथकातील अंमलदार हे संगमनेर शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास तळेगांव ते नादुर शिंगोटे जाणारे रोडलगत एक इसम त्याचे घराचे बांधकाम चालु असलेल्या घराचे आडोशाला पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली.पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम दोन डावामध्ये पत्त्यावर पैसे लावुन हारजितीचा जुगार खेळतांना दिसुन आलेे.सदर पत्ते खेळणारे पहिल्या डावातील 1) अजीज अबु शेख वय-45 वर्षे रा.तळेगांव दिघे ता.संगमनेर 2) आकाश बाबासाहेब गडाख, रा. पारेगांव बुाा ता. संगमनेर, 3) योगेश दत्तात्रय राहटळ रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर, 4) भास्कर बाबुराव पगार, रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर, 5) महेंद्र सुंदरलाल पाटणी, रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर, 6) कैलास कारभारी मळे, रा. काकडवाडी ता.संगमनेर, 7) नंदु म्हतु पिंगळे, रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर असे तसेच दुसऱ्या डावातील 8) इरफान युनिस शेख रा. लोणी (हसनापुर) ता.राहाता, 9) आशिफ कासम शेख, रा. करोले ता. संगमनेर, 10) रविद्र विठ्ठल जेजुरकर,रा.ममदापुर ता. राहाता,11) एकनाथ रोहीदास जोरवेकर,रा.पोरेगांव ता. संगमनेर,12)विलास भास्कर जगताप,रा.तळेगांव दिघे ता.संगमनेर,13) दशरथ बिरु कांदळकर रा.वज्रडी बुाा ता. संगमनेर,14)विजय रंभाजी ढवळे, रा.पारेगाव बु ाा ता. संगमनेर अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने,रोख रक्कम, 13 मोबाईल 9 मोटारसायकल असा 11,24,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमांविरुध्द पोकॉ/203 रमिझराजा रफिक आतार यांचे फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 438/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर व श्री. कुणाल सोणवने उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग संगमनेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बिरप्पा सिध्दप्पा करमल,बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे,अशोक हिरामन लिपणे,आकाश राजेंद्र काळे,रमिझराजा रफिक आतार यांनी केली आहे.