पैशाच्या व्यवहारातून एकाचे अपहरण भिंगार कॅम्प पोलिसांनी केली अपहरण झालेल्या व्यक्तिची एका तासातच सुटका
नगर प्रतिनिधी (दि.३. डिसेंबर):-पैशांच्या व्यवहारातून एकाचे अपहरण व मारहाण प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीसांनी तत्काळ तपास करून केली अपहरणीत व्यक्तीची एकाच तासात सुखरूप सुटका व
एका अपहरण करत्याला अटक केली आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी की दि.०१ डिसेंबर रोजी भिंगार कॅम्प पोस्टे ला माहीती मिळाली कि,आलमगीर परीसरातून एका व्यक्तीला काही इसमांनी अपहरण करून घेऊन गेले आहे अशी माहीती मिळताच भिंगार कॅम्प पोस्टेचे सपोनी/श्री.शिशिरकुमार देशमुख यांनी भिंगार कॅम्प पोस्टे मधील अधिकारी व अमलदार यांना सदर अपहरण कर्त्याला व अपहरण करण्यात आलेल्या इसमाचा शोध घेणे कामी पथकाला रवाना केले.गोपनीय माहीतीद्वारे अपहरणीत व्यक्ती हा वडारवाडी,भिंगार येथे एका खोलीत डांबून ठेवला आहे अशी माहीती मिळाल्याने तसेच तांत्रीक विश्लेशनाच्या
आधारे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पथक वडारवाडी, भिंगार येथे जावून खात्री केली असता दोन इसम हे वडारवाडी,भिंगार येथे मिळून आलेने त्यामधील एकाने सांगीतले कि,माझे नाव (सोहेल अथर हुसैन बोहरी वय 33 वर्षे रा.फुलारी टॉवर जवळ,आलमगीर ता.जि. अहमदनगर) असे असून या व्यक्तीने व याचे सोबत असलेल्या इतर लोकांनी माझ्या घरी येऊन मी त्यांचे कडून उसने घेतलेले पैसे माझ्याकडे आता नाही, माझ्याकडे पैसे आल्यावर मी देतो असे सांगून सुद्धा यांनी मला तसेच माझ्या घरच्यांना लाथाबुक्याने मारहाण करून मला बळजबरीने रिक्षा
मधून घेऊन वडारवाडी, भिंगार येथील एका खोलीत डांबून ठेऊन मला मारहाण केली आहे.तसेच त्यांनी माझ्याकडे असलेला माझा कार्बन कंपनीचा मोबाईल व माझे एटीएम माझ्याकडून बळजबरीने काढून घेतले आहे असे सांगीतलेने पोलीस पथकाने सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला आणून अथर हुसैन बोहरी यांच्या फिर्यादीवरून १)अंजुम बाबासाहेब सय्यद २)फैजान जहागिरदार ३)अश्पाक बाबासाहेब सय्यद ४)इरशाद बाबासाहेब सय्यद वय ३९ वर्षे रा.मोमीन गल्ली, भिंगार ता.जि.अहमदनगर व एक अनोळखी इसम यांचे विरूद्ध भादविक-143,147,149,365,452,327,342,324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर
गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1707 पी.ए.बारगजे हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत
खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सपोनी/शिशिरकुमार देशमुख,पोहेकॉ/विलास गारूडकर,पोना/भानूदास खेडकर,पोना/राहुल द्वारके, पोकॉ/अमोल आव्हाड, चापोकॉ/अरूण मोरे यांनी केली आहे.