Maharashtra247

पिकअप ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दोघे जागीच ठार

संगमनेर प्रतिनिधी (दि.3 डिसेंबर):-जिल्ह्यातील कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेर तालुक्यातील मांची फाटा येथे 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास पिकअप,ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले.या अपघातामुळे वडगावपान गावावर शोककळा पसरली आहे.या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अपघात झाल्यानंतर पिकअप चालक पसार झाला.त्यामुळे पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पिकअपचा आणि चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तालुका पोलिस करीत आहेत.

You cannot copy content of this page