Maharashtra247

कोल्हार येथे तीन गावठी कट्टे व सहा जिवंत कडतुसासह दोन सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी (दि.1 डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार,ता. राहाता येथे विक्री करण्याचे उद्देशाने तीन (03) गावठी कट्टे व सहा (06) जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणारे दोन सराईत आरोपी 91,800/- रु. (एक्याणव हजार आठशे रु.) किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, कोल्हार बुा,ता.राहाता येथे दोन इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार आहेत आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/दिनकर मुंडे,पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ,पोहेकॉ/विजय वेठेकर,संदीप घोडके, देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,लक्ष्मण खोकले,संदीप दरदंले,पोकॉ/रणजीत जाधव व चापोना/भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने गोसावी वस्ती, कोल्हार बुा,ता.राहाता येथील एका पत्र्याचे शेड जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना दोन इसम पत्र्याचे शेडमध्ये बसलेले दिसले. बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम असल्याची पथकाची खात्री होताच संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना ते पळुन जावु लागले लागलीच पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले व पोलीस पथक असले बाबतची ओळख सांगुन त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नावे 1)रविंद्र भाऊसाहेब थोरात वय 30,रा.कुरणपुर, ता.श्रीरामपूर व 2) बाळासाहेब भिमराज थोरात वय 59,रा.कोल्हार बुा,ता. राहाता असे असल्याचे सांगीतले.त्याची अंगझडती घेता अंगझडतीमध्ये तीन (03) गावठी बनावटीचे कट्टे व सहा (06) जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील दोन्ही इसमांकडे गावठीकट्टे व काडतुस बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले.त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास केला असता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे विक्री करीता आणल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपींकडे तीन (03) गावठी कट्टे व सहा (06) जिवंत काडतूस असा एकुण 91800/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोकॉ/2514 रणजीत पोपट जाधव ने. स्थागुशा,अहमदनगर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 608/2022 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन,पुढील कायदेशिर कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे रविंद्र भाऊसाहेब थोरात हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दरोडा तयारी,सदोष मनुष्यवध,मोटर व्हिईकल व आर्म ऍ़क्ट प्रमाणे एकुण -07 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. एमआयडीसी 138/2017 भादविक 283
2. सोनई 27/2012 भादविक 279 सह मोव्हिऍ़ 130/177
3. श्रीरामपूर शहर 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 3/25
4. लोणी 57/2018 भादविक 308 सह आर्म ऍ़क्ट 3/25, 27,
मपोकाक 37 (1)(3)/135
5. कोतवाली 77/2018 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
6. सोनई 77/2018 मोटर व्हिईकल ऍ़क्ट 110, 117
7. लोणी 608/2022 आर्म ऍ़क्ट 3/25
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब,उविपोअ शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page