राहुरी फॅक्टरी येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्यास राहुरी पोलिसांनी त्या प्रकरणात केली अटक
राहुरी प्रतिनिधी (दि.3.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील डि पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा उपप्राचार्य फादर जेम्स यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.या शाळेतील एका १४ वर्षीय विद्यार्थ्याशी धार्मिक वादग्रस्त वर्तन करत आमच्या धर्माचा स्वीकार कर,असे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांला दमदाटी केली.त्यामुळे फादर यांच्यावर धर्माचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी फॅक्टरी येथील डि पॉल इंग्लिश मीडियम स्कूल येथे एक १४ वर्षीय मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.तो दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान शाळेच्या मैदानावर होता.फादर जेम्स यांनी त्या विद्यार्थ्याला त्याच्या धर्माप्रमाणे सुरू असलेले वर्तन,पेहराव करण्यास मनाई केली.तसेच दमदाटी करुन मारहाण करण्यासाठी त्याच्या अंगावर धावले.त्यावेळी तो विद्यार्थी तेथून पळून गेला.त्याने घरी आल्यावर सदर घटना त्याच्या घरातील नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी गुरुवारी रात्री त्याला बरोबर घेऊन राहुरी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला.त्या विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिस ठाण्यात उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांच्या विरोधात भादंवि कलम २९५ (अ), २९८, ५०६ प्रमाणे धर्माचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.