बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार संगमनेर येथील घटना
संगमनेर प्रतिनिधी (दि.2.डिसेंबर संगमनेर):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोठे बुद्रक येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संपत जाधव या शेतकर्याच्या पाच शेळ्या ठार झाल्या आहेत.कोठे बुद्रुक येथील संपत जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या. मध्यरात्री बिबट्याने थेट जाळी तोडून आत प्रवेश करत शेळ्या ठार केल्या.सकाळी जाधव हे घराबाहेर आले असता त्यांना काही शेळ्या गोठ्याबाहेर मृत अवस्थेत दिसल्या.त्यानंतर जाधव यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा,अशी मागणी येथील सर्व शेतकऱ्यांनी केली आहे.