महिलांच्या हक्कांचा बुलंद आवाज…संध्याताई भगत जिल्हापरिषद निवडणुकीच्या रिंगणात..
जुन्नर (प्रतिनिधी):-जुन्नर तालुक्यातील सावरगाव कुसुर गटातून सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मोहन भगत यांनी येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. सामाजिक क्षेत्रातील दांडगा अनुभव,जनतेतील पोहच, महिलांसाठी राबवलेल्या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम आणि मतदार संघातील भक्कम जनसंपर्क यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास संध्याताईंनी व्यक्त केला आहे.संध्याताई भगत या गुलमोहर एनजीओ महिला व बाल संरक्षण संस्थेच्या अध्यक्ष असून,महिलांवरील अत्याचार प्रतिबंध,गरजू बालकांना न्याय आणि पुनर्वसन,शिक्षण–आरोग्य जनजागृती अशा अनेक उपक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला आहे.
यासोबतच त्या क्रिएटिव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती,आरोग्य शिबिरे, विधवा व गरजू महिलांसाठी सहाय्य योजनांची अंमलबजावणी केली आहे.तसेच त्या ICM औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सदस्य म्हणून तालुक्यातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या कामातही सक्रिय आहेत.त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रमातून शेतकरी,महिला,युवा आणि कष्टकरी वर्गाशी घट्ट नातं निर्माण झालं आहे.त्यांच्या उमेदवारीनंतर सावरगाव कुसुर गटात कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असून,अनेक महिलांनी व युवांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.“मी समाजासाठी काम केले आहे आणि पुढेही करत राहणार आहे.जनतेचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.विजय निश्चित आहे,” असा आत्मविश्वास संध्याताईंनी व्यक्त केला.
