महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी तुफान गर्दी!शिंदे गटात अर्जांचा पाऊस..17 वॉर्डमध्ये तब्बल 200 अर्जांचा डोंगर..प्रभाग 3 मधून शेखर तुंगार हाती घेणार धनुष्यबाण
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांचे वारे सुरु होताच,उमेदवारीसाठी तुफान स्पर्धा पाहायला मिळत असून शिंदे गटाच्या मागे इच्छुकांची प्रचंड गर्दी उमटली आहे.आज टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या मुलाखत प्रक्रियेसाठी उमेदवारांचा ओघ सतत सुरू होता.विशेष म्हणजे महानगरपालिकेतील एकूण प्रभाग क्रमांक १७ मधून तब्बल २०० उमेदवारांनी मुलाखत देत अर्ज सादर केले,ही संख्या पाहता आगामी निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत या प्रक्रियेला विशेष उठाव मिळवून दिला.
प्रभाग 3 मधून शेखर तुंगार यांची दमदार एन्ट्री
याच मुलाखत प्रक्रियेत प्रभाग क्रमांक ३ मधून सामाजिक कार्यकर्ते शेखर तुंगार यांनीही मुलाखत दिली.प्रभागातील सामाजिक प्रश्नांची जाण,विकासकामांतील सक्रियता आणि नागरिकांशी जुळलेली नाळ या जोरावर ते उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
मुलाखतीनंतर बोलताना शेखर तुंगार म्हणाले,“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी दृष्टी स्पष्ट आहे. पक्षाने मला उमेदवारी देऊन संधी दिल्यास या प्रभागाचा संपूर्ण कायापालट करणार आहे. नागरिकांना दिलासादायक, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रतिनिधित्व देणे हे माझे ध्येय आहे.”
शिंदे गटात उमेदवारीसाठी अभूतपूर्व उत्साह
गर्दीचा प्रचंड लोंढा पाहता शिंदे गटाची आगामी निवडणुकांतील ताकद आणि लोकप्रियता अधोरेखित होते. उमेदवारी मिळवण्यासाठी तरुण,महिला आणि अनुभवी कार्यकर्ते अशा सर्व स्तरातून इच्छुक पुढे येत आहेत.
